Monday, February 19, 2024

कुकुट पालना बद्दलची माहिती उन्हाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन

 उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढले की शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कोंबड्या तोंडावाटे उष्णता बाहेर टाकतात त्याचा विपरीत परिणाम वाढ आणि रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो हे लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात

विशेषतः मार्च एप्रिल मे आणि जून या महिन्यात कोंबड्यांच्या व्यवस्थापनात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रण करता येत नाही कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी 18 ते 23 अंश सेल्सिअस तापमान पुरेसे आहे पण कोंबड्या 28 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान सहन करू शकतात कोंबड्या उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढले की शरीराचे तापमान कमी करण्यासाठी तोंडावाटे उष्णता बाहेर टाकतात त्याला प्यटिंग (धापणे)म्हणतात उन्हाळ्यात प्रत्येक वेळी त्यांना शारीरिक तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी प्यटिंग आधार घ्यावा लागतो त्याचा विपरीत परिणाम वाढ आणि रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो.

#  उष्माघाताचे लक्षणे  #

१)  उन्हाळ्यातील वातावरणातील तापमान वाढल्यानंतर कोंबड्यांना उष्णतेचा त्रास वाढतो त्यानंतर ताण पडल्यावर कोंबडी जोरजोराने श्वास घेण्याचा प्रयत्न करतात श्वासन मार्ग कातडी व पोटाचे स्नायू याकडे रक्ताचा पुरवठा वाढतो .

२)  पाणी पिण्याचे प्रमाण वाढते खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.

३)  उष्णतेचा त्रास होऊन हगवण लागते त्यामुळे शरीरातील आवश्यक इलेक्ट्रो लाईट निघून जातात त्यामुळे कोंबडी खूप कमजोर आणि क्षीण बनते.
विष्टेमधील पाण्याचे प्रमाण वाढल्याने तूस गादी जास्त ओली होते गादी मधील अमोनियम चे प्रमाण वाढते त्यामुळे श्वासनलिकेचा त्रास उद्भवतो

४)  उष्माघाताचा त्रासामुळे कोंबड्या शांतपणे बसून राहतात त्यांच्यात मंद व सुस्तपणा दिसून येतो.

५)  रोग रोगप्रतिकारक क्षमता कमी होते जास्त उष्माघातामुळे मरतुकीचे प्रमाण वाढते. 
 
६)  खाद्याचे  मांसात रूपांतर  करण्याची क्षमता कमी होते , वजनात घट होते , कोंबड्या भिंतीच्या आडोशाला पडून राहतात.

 ७)  पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ थंड जागेत मान वाकून बसतात , शरीराचे तापमान कमी करण्यासाठी , थंडपणा आणण्यासाठी पंख शरीरापासून दूर पसरवितात ,  दम लागल्याने तोंडाची उघडझाप करून धाप टाकतात.

८)   त्वचा रखरखीत होते , रंगांमध्ये बदल दिसून येतो , अंड्यांची गुणवत्ता कमी होते .

९)  18 ते 21 अंश वाढीसाठी सोयीस्कर तापमान .

१०)  22 ते 25 अंश हे तापमान त्रासदायक नसते परंतु खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते .

 ११)  26 ते 30 अंश तापमानात दिवसभरात खाद्य खाण्याचे प्रमाण घटते , त्यांना उष्णतेचा त्रास जाणवू लागतो .

१२)  31 ते 35 अंश तापमानात उष्माघाताचा त्रास वाढतो , खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते , तोंडाने श्वास घेतात.
 
१३)  ३५ अंश हे तापमान खूप हानिकारक असते मरतुक होण्याची शक्यता वाढते.




उपाययोजना :-

- उन्हाळ्यात पाणी पिण्याचे क्षमता वाढते त्यामुळे शुद्ध व थंड पाणी मुबलक प्रमाणात पुरवावे .

- उन्हाळ्यात थोडी जास्त मोकळी हवा उपलब्ध करून द्यावी शेड मधील संख्या इतर ऋतूपेक्षा कमी ठेवावी 

-  शेड मधील कामे पहाटे सकाळी पूर्वी करावीत.

 -  उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत शेड मधील कामे टाळावीत 

-  पिण्याच्या पाण्यातून जीवनसत्व A , k , आणि  e पुरवावीत त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता उत्तम राहील

- क्लोरीन युक्त पाण्याचा वापर करावा त्यामुळे पाण्यातून होणारे आजार टाळता येतील .

-   पिण्याच्या पाण्याची भांडी संख्या दुपटीने वाढवावी लसीकरण पहाटे किंवा रात्रीच्या वेळी करावे.

व्यवस्थापन

-  उन्हाळ्यात खाद्य देण्याचे एक वेळापत्रक ठरवून घ्यावे तज्ञांच्या सल्ल्याने काटेकोरपणे पालन करावे.

-   उन्हाळ्यात कोंबड्या चार आठवड्याच्या झाल्यावर त्यांना दुपारच्या वेळेत खाद्य देऊ नये.

-   उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत खाद्य भांडी उंचीवर ठेवावी

-   उन्हाळ्यात खाद्य अन्नघटक प्रथिने अमिनो आम्ल आणि मेदयुक्त असावे त्यामुळे कोंबडी कमी खाद्य खाऊन जास्तीत जास्त अन्नघटक मिळावेत .

-  उन्हाळ्यातील खाद्य घटकात तेलाचा वापर अधिक प्रमाणात करावा खाद्यात ऊर्जेचे प्रमाण 180 ते 150 किलो कॅलरीने कमी करून अमिनो आम्ल जीवनसत्वे आणि खनिजे यांचा वापर अधिक प्रमाणात करावा.

-  अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्यात खाण्याचा सोडा 750 ते 1000 ग्रॅम प्रति टन या प्रमाणात वापरावा त्यामुळे अंड्याचे कवच मजबूत राखण्यास मदत होईल.

 -  मार्बल चे तुकडे / शिंपला चुरा चुरा संतुलित खाद्यावर दिवसातून एक वेळेस पसरावा त्यामुळे अंड्यांची गुणवत्ता राखता येईल.

 -  शेड ची लांबी पूर्व पश्चिम ठेवावी जेणेकरून थेटवून येण्याचे प्रमाण कमी होईल हवा खेळती राहील बाजू भिंती आणि मध्यभागाची उंची जास्तीत जास्त ठेवावी छत शक्यतो आयासबेस्तोस पत्र्याचे असावे. 

-   शेडच्या रुंदीच्या भिंतीस घराबाहेर हवा टाकणारे पंखे बसवावेत .

-  शक्य असल्यास छतावर उष्णता रोधक आवरण पसरवावे वाळलेले गवत पसरवल्याने वातावरण थंड राहील.

-   शेडच्या आजूबाजूला झाडे असावीत त्यामुळे सभोवतालचे वातावरण थंड राहते तापमान कमी राखण्यास मदत होईल.

-   बारदाना बाजूच्या भिंतीला जाळीस लावून ओली करावीत असे करताना शेडमधील आर्द्रता वाढणार नाही आणि तूच ओली होणार नाही याची काळजी घ्यावी.

-   छतावर स्प्रिंकलर्स लावावेत जेणेकरून शेडमध्ये थंडावा राहील . 

-  शेडमध्ये फॉगर्स बसवावेत त्यामुळे तापमान कमी राखण्यास मदत होईल.

-   पिण्याचे पाणीपुरवठा करणारी टाकी शेडमध्ये बसवावी जर बाहेर टाकी असेल तर त्यास बारदानाच्या साह्याने गुंडाळून त्यावर थंड पाणी मारावे.

No comments:

Post a Comment

महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा

  महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा  Up...